नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या…
सिटीलिंक बस वाहतुकीच्या नियोजनात मोठा बदल…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पासून सुरु होणारा दिवाळी सण व शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या लक्षात घेता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने नियमित बसेसच्या नियोजनात बदल करण्यात आले आहे.
दिवाळी सण व शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या लक्षात घेता प्रवासी संख्येत काही प्रमाणात घट होत असते त्यानुसार सुट्टी कालावधीत प्रवासी संख्या लक्षात घेता बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर कालावधीत सकाळ सत्रात रविवारच्या सुट्टीच्या नियोजनानुसार बसेस चालविण्यात येतील तर दुपार सत्रात नियमित नियते चालविण्यात येतील. तर दिनांक २२ ऑक्टोबर पासून नियमित नियते चालविण्यात येतील. याशिवाय शाळा महाविद्यालयांच्या मार्गावरील व प्रवासी संख्या जास्त असणाऱ्या मार्गांवर शाळा महाविद्यालयांच्या सुट्टीच्या कालावधीत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
१) तपोवन आगार –
मार्ग क्रमांक १३१ – निमाणी ते गिरणारे – सद्यस्थितीत सुरु असलेल्या ८ बसेस ऐवजी ४ बसेस चालविण्यात येतील. ४ बसेसच्या माध्यमातून दर ३० मिनिटांना बसफेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मार्ग क्रमांक १०२ – निमाणी ते बारदानफाटा मार्गे एच पी टी महाविद्यालय – सद्यस्थितीत सुरु असलेल्या सर्व ४ हि बसेस महाविद्यालयांना सुट्टी असल्याकारणाने बंद करण्यात येतील.
मार्ग क्रमांक १४६ – निमाणी ते सिन्नर – सद्यस्थितीत सुरु असलेल्या बसेस व्यतिरिक्त ४ बसेस अतिरिक्त चालविण्यात येतील.व दर १० मिनिटांना बसफेरी उपलब्ध असेल.
मार्ग क्रमांक १५२ – नवीन सीबीएस ते पिंपळगाव – सद्यस्थितीत सुरु असलेल्या बसेस व्यतिरिक्त ४ बसेस अतिरिक्त चालविण्यात येतील. व दर १० मिनिटांना बसफेरी उपलब्ध असेल.
२) नाशिकरोड आगार –
मार्ग क्रमांक २२१ ( नाशिकरोड ते शिंगवे बहुला मार्गे विहितगाव), मार्ग क्रमांक २२२ ( नाशिकरोड ते शिंगवे बहुला मार्गे वाडीचे रान), क्रमांक २२३ ( नाशिकरोड ते शिंगवे बहुला मार्गे पिंपळगाव खांब), मार्ग क्रमांक २३१ (नाशिकरोड ते जेआयटी महाविद्यालय मार्गे सातपूर), मार्ग क्रमांक २२० (नाशिकरोड ते मातोश्री महाविद्यालय), मार्ग क्रमांक २६४ (तपोवन ते आर्मी पब्लिक स्कूल), मार्ग क्रमांक २६४ ए(नाशिकरोड ते आर्मी पब्लिक स्कूल) असे एकूण ७ मार्गावरील बसेस शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याकारणाने सुट्टी कालावधीत बंद करण्यात येतील.
तर मार्ग क्रमांक २१० नाशिकरोड ते दिंडोरी या मार्गावरील सद्यस्थितीत सुरु असलेल्या बसेस व्यतिरिक्त ४ बसेस अतिरिक्त चालविण्यात येतील. दर १० मिनिटांना बसफेरी उपलब्ध असेल.
मार्ग क्रमांक २०२ – नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे एच पी टी महाविद्यालय – सद्यस्थितीत सुरु असलेल्या ८ बसेस ऐवजी ४ बसेस चालविण्यात येतील. ४ बसेसच्या माध्यमातून दर ४० मिनिटांना बसफेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच सिटीलिंकचे सर्व पास केंद्र दिनांक २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील तर केटीएचएम महाविद्याल येथील पास केंद्र दिनांक १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत बंद राहतील याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.