नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर बससेवा असलेल्या सिटीलिंकने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे वृत्त आहे. वर्ष २२–२३ मध्ये काढलेल्या दिव्यांग मोफत कार्डला मुदतवाढ. ३१ मार्च ऐवजी आता ३१ मेनंतर कार्डचे करता येणार नूतनीकरन.मुदत वाढविण्यात आल्याने प्रवाश्यांनी कार्ड नूतनीकरणासाठी पास केंद्रावर गर्दी करू नये. या संदर्भातील अद्ययावत माहिती प्रवाश्यापर्यंत पोहचविण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सिटीलिंक प्रशासनाने कळविले आहे.
https://twitter.com/CitilincNashik/status/1640218817161994243?s=20
शहर बससेवा असलेल्या सिटीलिंकने दिव्यांगांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या १ नोव्हेंबरपासून सिटीबसमध्ये दिव्यांगाना मोफत प्रवास करता येत आहे. यासाठी दिव्यांगांना मोफत बस प्रवासाचा पास बंधनकारक करण्यात आला आहे. यासंदर्भातील अटी-शर्थी सिटीलिंकने जाहीर केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
https://twitter.com/CitilincNashik/status/1580177176464617477?s=20&t=GRc4-cL1FsotB2q-3VfAOQ
Nashik City Bus Citilinc Service Divyaang Disable Persons