नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक सिटीलिंक या शहर बससेवेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळेच नाशिक महापालिकेने आता तीन नव्या मार्गांवर सिटीबसची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच २५ एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार आहे. त्यात पहिला मार्ग नाशिकरोड ते चुंचाळे गाव असा राहणार आहे. ही बस द्वारका, शालिमार, नवीन सीबीएस आणि कामटवाडे या मार्गे धावणार आहे. दुसरा मार्ग नाशिकरोड ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असा राहणार आहे. ही बस द्वारका, शालिमार, आनंदवली, गंगापूर या मार्गे धावणार आहे. तर, तिसरा मार्ग नाशिकरोड ते गंगावऱ्हे असा राहणार आहे. ही बस द्वारका, शालिमार, आनंदवली, गंगापूर मार्गे धावणार आहे.
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर राज्यासह परराज्यातून प्रवासी येतात. या प्रवाशांना शहराच्या या तिन्ही नव्या भागांमध्ये जाण्यासाठी या नव्या बसफेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. या तिन्ही मार्गांना उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा सिटीलिंक प्रशासनाला आहे.
https://twitter.com/CitilincNashik/status/1517830073734164482?s=20&t=-rQWq_mCfCVXk7nJtQigOg









