नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या शहर बससेवेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काही मार्गांवर आणखी बस फेऱ्या देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार आता तीन मार्गांवर अतिरीक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. हे मार्ग आणि त्याच्या वेळा खालीलप्रमाणे
पाथर्डी गाव ते बारदान फाटा मार्गे गरवारे, सीमेन्स, एक्सलो पॉईंट, कदम भवन, पपया नर्सरी या मार्गावर आता सेवा मिळणार आहे. त्यासाठी सकाळी ८.४०, सकाळी ११.००, दुपारी ३.०० वाजता बस फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बस फेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे..
बारदान फाटा ते चुंचाळे गाव या मार्गावर दुपारी १२.०५, सायंकाळी ५.१५ वाजता, तसेच चुंचाळे ते तपोवन मार्गे सातपूर सायंकाळी ५.५५ वाजता फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय मार्ग क्रमांक ११७ वरच बारदान फाटा ते पाथर्डी गाव या मार्गावर सकाळी ७.३०, सकाळी ९.५०, दुपारी १२.०५ आणि दुपारी १.४५ वाजता सेवा दिली जात आहे.
बेळगाव ढगा ते सातपूर या मार्गावर सकाळी ११.३० वाजता तर सातपूर ते बेळगाव ढगा दुपारी १२.०० वा बसफेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्ग क्रमांक ११७ – तपोवन ते चुंचाळे गाव (सातपूर मार्गे) सकाळी ५.५० वाजता आणि चुंचाळे गाव ते बारदान फाटा या मार्गावर सकाळी ६.४५, दुपारी १३.०० वाजता सेवा सुरू करण्यात आली आहे.
Nashik City Bus Additional CITILINC Service