नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ काठे गल्ली सिग्नल भागात भरधाव सिटीलिंक बसने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमित रमेश ठाकरे (४० रा.शंकरनगर, टाकळीरोड, द्वारका) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठाकरे सोमवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास एमएच १५ टीबी ०७५१ या दुचाकीने द्वारकाकडून नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. नाशिक पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नल जवळ पुढील नासर्डी ब्रिज भागात पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात सिटीलिंक बसने दुचाकीस धडक दिली. या अपघातात ठाकरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू असतांना मंगळवारी (दि.२५) त्यांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651170154745835523?s=20
Nashik City Bus Accident Two Wheeler Death