नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिटको चौकातील उड्डाणपूलाखालील चौफुलीवर भरधाव सिटीलिंक बसने दिलेल्या धडकेत पादचारी जखमी झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी शाम कसबे (रा.शिकलकर वस्ती, सिन्नरफाटा) असे जखमी पादचा-याचे नाव आहे. कसबे गेल्या रविवारी (दि.४) रात्री बिटको चौकातील उड्डाणपूलाखाली रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. पाठीमागून येणाºया एमएच १५ जीव्ही ७६९३ या सीटीलिंक बसने त्यास धडक दिली होती.
या अपघातात जखमी झाल्याने त्यास तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी सागर कसबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात बसचालक शरद हिरामण सुर्यवंशी (४२ रा.पिलखोड ता.चाळीसगाव) याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
……