नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांच्या मागणीमुळे आता शहर बससेवेच्या दोन सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. नाशिक सिटी बसची निमाणी ते बारदान फाटा अशी असलेली सेवा आता थेट गंगापूर गावापर्यंत असणार आहे. त्यामुळे ही सेवा आता निमाणी, सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर, बारदान फाटा ते गंगापूर गाव अशी राहणार आहे. तर, निमाणी ते सिम्बायोसिस दरम्यान असलेली बससेवा आता थेट अंबड गावापर्यंत असणार आहे. त्यामुळे ही सेवा आता निमाणी, सिव्हिल हॉस्पिटल, पवन नगर, उत्तम नगर, सिम्बायोसिस मार्गे थेट अंबड गाव अशी राहणार आहे. दिवसभरात या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात फेऱ्या होतात. त्यामुळे आता या दोन्ही सेवांचा विस्तार करण्यात आल्याने अंबड गाव आणि गंगापूर गावातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
https://twitter.com/CitilincNashik/status/1517834466495918082?s=20&t=i3ansFpTG_R8WhJMseHtsg