.
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रविवार २६ जानेवारी रोजी संपूर्ण देशात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. याच निमित्ताने नाशिकमध्ये देखील विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवार २४ जानेवारी रोजी नाशिकच्या पंचवटी परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगरी याठिकाणी सुमारे ३१ हजार विद्यार्थ्यांचा राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रम पार पडणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता विद्यार्थांची ने आण करणेकरीता सिटीलिंक देखील बसेस उपलब्ध करून देणार आहे.
शुक्रवार २४ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या या कार्यक्रमाकरिता एकुणापैकी सुमारे १७४६४ विद्यार्थ्यांचीने आण करण्याची जबाबदारी सिटीलिंकवर असणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता सिटीलिंकच्या एकूण ७५ बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत निमाणी बस स्थानकातून होणारी वाहतूक पूर्णतः बंद असेल.
सदरची वाहतूक तपोवन डेपो कोर्नर येथून करण्यात येणार आहे. तसेच काही मार्गांवरील बसेसची संख्या देखील या वेळी काही अंशी कमी असणार आहे. त्यामुळे सदर वेळेत प्रवाश्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच दुपारी १२ वाजेनंतर संपूर्ण नाशिक शहरातील बस वाहतूक पूर्ववत सुरु राहील याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.