नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याच्या सिलबंध गोडावूनमधून चोरट्यांनी सुमारे २६ लाखाचे साहित्य चोरून नेले. त्यात स्ट्रिप कॉपर बसबार किट नावाचे मटेरियलचा समावेश आहे. कारखान्यातील कामगारांनी स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी साहित्याची चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद अशोक देशमुख (रा.सिरीन मिडोज,आनंदवली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देशमुख यांचा औद्योगीक वसाहतीतील प्लॉट सी मध्ये सिमेन्स लिमिटेड नावाचा कारखाना आहे.
या कंपनीच्या सिलबंद गोडावून मध्ये सुमारे २६ लाख रूपये किमतीचे स्ट्रिप कॉपर बसबार किट नावाचे मटेरियल ठेवण्यात आले होते. २ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात कामगारांनी हे साहित्य लांबविले. अधिक तपास उपनिरीक्षक पाडेकर करीत आहेत.