नाशिक – शहरातील कोरोना संसर्गाच्या स्थितीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कलम १४४ लागू केले आहे. तसे आदेश आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आज काढले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून येत्या ३१ जानेवारीपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत. या आदेशानुसार कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. लग्न समारंभ किंवा सामाजिक कार्यासाठी केवळ ५० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स, मॉल्स, शोरुम्स, रेस्टॉरंट येथे केवळ ५० टक्के उपस्थितीला परवानगी असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्तांचे मूळ आदेश खालीलप्रमाणे