नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड जवळ दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना चक्कर येवून पडल्याने २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. दर्शन योगेश दिघे (मुळ रा.परमोरी ता.दिंडोरी ह.मु. रामचंद्रनगर, म्हसरूळ) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिघे रविवारी (दि.२१) मित्राच्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कॉलेज रोड भागातून दोघे मित्र केबीटी सर्कल मार्गे म्हसरूळच्या दिशेने डबलसिट प्रवास करीत होते. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या दर्शनला अचानक चक्कर आल्याने तो धावत्या दुचाकीवरून पडला.
या घटनेत तो जखमी झाल्याने काका विकास दिघे यांनी त्यास अशोका हॉस्पिटल मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.