नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील मिनाताई ठाकरे परिसरातील सर्व्हीस रोडवर अॅटोरिक्षा आणि आयशर मालट्रकमध्ये झालेल्या धडकेत रिक्षातील प्रवासी ठार झाला. बिरेश्वर बिजन देवनाथ (५४, रा.स्वामी अव्हेन्यू, रूंग्ठा बेलिसीओच्या बाजूला, पार्क साईट मागे) असे मृत प्रवाश्याचे नाव आहे. या अपघातात रिक्षाचालकासह मयताचा प्रवासी मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत देवनाथ व त्यांचा मुलगा बुधवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास रिक्षातून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एमएच १५ एफयू ०८८७ या रिक्षातून दोघे बापलेक बळीमंदिराच्या दिशेने सर्व्हीस रोडने जात असतांना समोरून भरधाव आलेल्या आयशर ट्रकने (एमएच १५ एच एच ४४१८) रिक्षाला धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेले देवनाथ यांचा मृत्यू झाला तर चालकासह त्यांचा मुलगा जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अधिक तपास हवालदार देवराम वणवे करीत आहेत.

???? प्रतिक्षा समाप्त!
*इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार*
येथे पाहता येणार
https://t.co/rdwCmrJLjS #indiadarpanlive #maharashtra #board #ssc #result #announcement
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) June 1, 2023