नाशिक – कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आता नाशिक महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठीच आता शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे २४ तास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शहरातील ४ केंद्र महापालिकेने निश्चित केले आहे. यात नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल, सातपूर येथील मायको हॉस्पिटल, पंचवटीतील इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि सिडकोतील मोरवाडी हॉस्पिटल या केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना लस घेण्याची इच्छा आहे ते या केंद्रांमध्ये २४ तास केव्हाही जाऊ शकतात आणि लस घेऊ शकतात, असे महापालिकेने सांगितले आहे. सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या विषाणूने सर्वत्र चिंता वाढविली आहे. त्यामुळे या संसर्गापासून वाचविण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.