नाशिक – गेल्या सहा दिवसापूर्वी संपावर असलेल्या महसूल कर्मचा-यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले. यावेळी मंत्री थोरात यांनी आठवडाभरात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व संप मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी यांनी आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे सांगितले. १० मे २०२१ चा शासन निर्णय मुळात चुकीचा काढला असून मॅटचे आदेशचे एमपीएससीमार्फत येणाऱ्या सरळ सेवेच्या नायब तहसीलदार यांचे बाबत असतानाही पदोन्नतीने नायब तहसीलदार होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लादण्यात आलेले आहे. हे अन्यायकारक आदेश रद्द केल्यास पदोन्नतीचा मार्ग सुकर होणार आहे असे संघटनेच्या वतीने विनम्रपणे सांगण्यात आले. यावेळी मंत्री थोरात यांनी लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, कार्याध्यक्ष तुषार नागरे, कोषाध्यक्ष रमेश मोरे, संघटक जिवन आहेर, पदोन्नत नायब तहसिलदार सर्वश्री पोपटराव सोनवणे, प्रविण गोंडाळे, विलास वैद्य, दिनेश पाडेकर तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य श्री सचिन पोतदार, नितीन गांगुर्डे, श्री ब्राहीकर, आदित्य परदेशी, तुषार सुर्यवंशी, आनद लगरे, अनिल वैद्य. अमोल हांडगे, अरुन तांबे इ. महसुल कर्मचारी उपस्थित होते.