नाशिक – महापालिकेच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या सिटी लिंक या शहर बससेवेला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी विद्यार्थ्यांना शहर बससेवेचा वापर करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना सवलतीत पास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे त्याचा लाभ आता विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यासाठी महापालिकेने चार ठिकाणी विद्यार्थी सवलत पास देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अधिक माहितीसाठी खालील फोटो बघावा