नाशिक – महापालिकेला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे पहिल्यांदाच शहराच्या सर्वच भागातील लसीकरण केंद्रांवर आज (३ जुलै) लस मिळणार आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांना आज लस घेता येणार आहे. कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस खालील केंद्रांवर उपलब्ध असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.