नाशिक – सिडकोत युवकाचा ३ ते ४ जणांनी निघृण खुन केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन एकास ताब्यात घेण्यात आले आहे. मृत युवकाचे नाव प्रसाद भालेराव (वय २५ वर्षे, रा उपनगर) असे आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सिडको परिसरात काही दिवसांपूर्वी सिडको पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने तीन जणांना कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता स्टेट बँकेजवळील सोनाली मटण भाकरी हॉटेलच्या परिसरात काही तरुणांमध्ये वाद झाला. हॉटेलमध्ये बसण्यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच वादातून एका तरुणास फरशी व खुर्चीने जबर मारहाण करण्यात आली. त्यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक जवळील सोनाली हॉटेल जवळ बुधवारी (२८ जुलै) रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास ३ ते ४ जणांनी प्रसाद भालेराव या युवकाला किरकोळ कारणावरुन फरशीने जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या युवकास उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, गुन्हे शाखा सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्या आला आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.