नाशिक – शहरातील सिडको परिसरात पुन्हा एकदा वाहन जाळपोळीची घटना घडली आहे. वाहन जाळपोळीच्या घटना वारंवार घडत असून याद्वारे नाशिक पोलिसांनाच थेट आव्हान दिले जात असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी रात्री दोन वाहने सिडको परिसरात जाळण्यात आली आहेत. मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने तुळजा भवानी चौक येथील धनंजय काळोखे यांची बुलेट तर गणेश चौक मनपा शाळेसमोर राहणारे सोनाली अंकित त्रिभुवन यांची होंडा कंपनीची ग्रॅझिया गाडी जाळली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंबड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पीएसआय शेख करीत आहेत.