नाशिक – सिडकोतील शुभम पार्क परिसरातील सोने चांदीच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल ७ लाख रुपये किंमतीचे दगिने लांबविले आहेत. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून अंबड पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम नगर परिसरातील शुभम पार्क , बंदावणे नगर येथे शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सद्गुरूअलंकार या सोन्याच्या दुकानाचे मालक प्रमोद विभांडीक हे नेहमी प्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले . त्यानंतर दुकानाजवळ पडलेला घाण साफ करण्यासाठी ते त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूस पाणी आणण्यासाठी गेले. त्यापूर्वी बाजूला असलेल्या किराणा दुकानदाराला त्यांनी लक्ष ठेवण्यास सांगितले.
त्यानंतर किराणा दुकानात दोन तरुण सामान घेण्याच्या बहाण्याने आले व दुकानदाराची दिशाभूल केली तीन इसम पैकी दोन किराणा दुकानात तर एक ज्वेलरी शॉप मध्ये घुसला प्रमोद विभांडक यांनी ठेवलेली बॅग चोरी करत त्यांना सातपूरकडे जाण्याचा पत्ता विचारला . ही बाब दुकानमालक यांच्या लक्षात आली व ते तातडीने दुकानाकडे आले असता आपली बॅग लंपास झाल्याचे समजून आले .
दुकान मालक प्रमोद विभांडीक हे नेहमी प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले . त्यानंतर दुकानाजवळ पडलेला घाण साफ करण्यासाठी ते त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूस पाणी आणण्यासाठी गेले . त्यापूर्वी बाजूला असलेल्या किराणा दुकानदाराला त्यांनी लक्ष ठेवण्यास सांगितले त्यानंतर किराणा दुकानात दोन तरुण सामान घेण्याच्या बहाण्याने आले व दुकानदाराची दिशाभूल केली तीन इसम पैकी दोन किराणा दुकानात तर एक ज्वेलरी शॉप मध्ये घुसला प्रमोद विभांडक यांनी ठेवलेली बॅग चोरी करत त्यांना सातपूरकडे जाण्याचा पत्ता विचारला.
ही बाब दुकानमालक यांच्या लक्षात आली व ते तातडीने दुकानाकडे आले असता आपली बॅग लंपास झाल्याचे समजून आले. त्यात तब्बल १५० ग्रॅम वजनाचे तसेच काही रोख रक्कम असा ऐकून ७ लाखा रुपयांचा मुद्देमाल बॅगेत होती. घटनेची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात , सहायक पोलिस आयुकत सोहेल शेख , वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आपली बॅग पत्ता विचारणाऱ्या इसमानेच गायब केली असल्याचे समजले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.