नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील जाखोरी गावाजवळील चांदगिरी येथे आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घरासमोर असलेल्या कडवा कालव्यात पोहण्यासाठी तो गेला होता. पण, पाण्याचा अंदाज चुकल्याने तो पाण्यात बुडाला. कार्तिक शिवाजी शेलार (८) असे या मृत मुलाचे नाव आहे.
ही घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नाशिक रोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काळजी घेणे आवश्यक
जुलै महिन्यात अशीच एक घटना घडली होती. नांदगाव तालुक्यातील बोलठाण-जातेगाव येथील कृषी महाविद्यालयात शिकणा-या सागर म्हसू कांदे या १९ वर्षीय तरुणाचा कॉलेज आवारातील शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. जळगाव बुद्रुक येथील हा विद्यार्थी होता. अशाच काही दुर्दैवी घटना याअगोदर झाल्या आहेत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या घटना घडत असतात. त्यामुळे पाण्यात पोहण्यासाठी जातांना याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.
नाशकात तीन ठिकाणी अवैध दारु अड्ड्यांवर छापा
अवैध दारु विक्री करणाऱ्या शहरातील वेगवेगळ्या दारु अड्यावर पोलिसांनी छापे टाकून दारु बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी एका महिलेस तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहे. इंदिरानगर, आनंदवल्ली आणि मखमलाबाद भागात पोलिसांनी ही कारवाई केली. स्वातंत्र्यदिनी ड्राय डे असूनही ही दारु विक्री करण्यात येत होती. पहिल्या घटनेत आनंदवल्ली शिवारात मारुती मंदीरामागील जोशी वाड्यात छापा टाकून ५ हजार ४३५ रुपयांच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तर दुस-या घटनेत म्हसरुळ भागात दुपारी दीडच्या सुमारास मखमलाबाद गावातील बस स्टॅण्ड समोरील टपरीच्या आडोशाला छापा टाकून ९८० रुपयांच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तिस-या घटनेत इंदिरानगरला पाचच्या सुमारास कारवाई करत २ हजार ६९५ रुपयांच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या.
nashik child water drown death
Rural Jakhori Kadwa Canal