मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक केमिस्ट संघटनेचा मेळावा संपन्न; जगन्नाथ शिंदे यांनी दिला हा इशारा

मे 8, 2022 | 8:25 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220508 WA0351

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉपोरेट कंपन्या मोठ्या ताकदीने उतरल्या आहेत. या कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धत टिकण्याासाठी लहान होलसेलर व रिटेलर फार्मासिस्टने एकत्रित येवून व्यवसाय केला पाहिजे. त्याचबराबेर पारंपारिक केमीस्टचे दुकान न ठेवता अद्यावत शॉपी करून ग्राहकांशी स्नेह वाढवून कौटूंबिक नाते निर्माण केले तरच फार्मसिस्ट टिकेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमीस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सील परिषदेच्या निवडणूकीच्या निमीत्ताने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये नाशिक विभागातून उमेदवारी करीत असलेले नाशिक केमीस्ट असो.चे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रातील औषधी व्यवसाय व त्यासमोरील आव्हाने या विषयावर बेालताना शिंदे म्हणाले की, जग हे पेशंट केअर आहे. या व्यवसायात टिकण्यासाठी ग्राहकांशी संवाद वाढविला पाहिजे. त्यांची कौटूबंीक नाते निर्माण करून त्यांची काळजी घेतली पाहिजे.

कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत टिकताना शॉपी अद्यावत व इंटरनेट, सोशल मिडीयाशी जोडली गेली पाहिजे. अन्यथा स्पर्धेतच्या काळात बाहेर फेकले जावू. ‘बजेट तुमचे औषध आमचे’ हे ब्रीद घेवून केमीस्ट बांधवांनी व्यवसायात मार्गक्रमण केलेप पाहिजे. फार्मासिस्ट बांधवांनी संघटीत होण्याची गरज आहे. संघटीत राहीलो नाही तर मोठा मासा खावून टाकेल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी एमसीडीएच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहनही आप्पा शिंदे यांनी केले. याप्रसंगी मानद सचिव अनिल नावंदर यांनीही मनोगतात, फार्मसी व्यावसायकांसमोरील आव्हाने समजून सांगताना ऑनलाईनच्या काळात औषधे विक्रेत्यांनी ग्राहकांचे हित जोपसाण्याबरोबरच रिटेर्ल्सने एकत्रित येवून एकमेकाला सांभाळून घेतले पाहिजे. मेळाव्यास, सुरेश पाटील,अजीत पारख, नरेश भगत, योगेश बागरेचा, रविंद्र पवार, शशांक रासकर, सुनील भंगाळे, चेतन कर्डिले, राजेंद्र डागा, राजेंद्र धामणे, किरण छाजेड आदीनी मनोगत व्यकत केले.

जॉब पोर्टल अद्यावत करणार
एमसीडीएच्या निवडणूकीतील उमेदवार व नाशिक केमीस्ट असो.चे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी प्रास्ताविकात उमेदवारी करण्यामागे केवळ फार्मसीस्ट संघटीत करण्याचा उद्देश आहे. एमसीडीएमध्ये अध्यक्ष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाल्यास पहिल्यांदा जॉब पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील औषध कंपन्यांकडे उपलब्ध जागंची माहिती दिली जाणार आहे. फार्मासिस्टला नोकरी मिळवून देण्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून चौवीस तास सेवा उपलब्ध करूनदेण्यात येईल. राज्यभरातील छोट्या छोट्या केमीस्टला एकत्रित करून साखळी पद्धतीने दुकाने सुरू करण्यात येतील. मुंबईच्या केमीस्ट भवन मध्ये नियमीत रिफ्रेशर कोर्सस, नवीन संधीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

महिला फार्मसीस्टचा सत्कार
यावेळी कोरोना काळात अविरत सेवा देणार्‍या स्नेहल झळके, योगिता वाजे, वैशाली चतुर, कांचन पाटील, तनुजा सोननीस, दिपाली म्हस्के, सोनाली वारुंगसे, ज्योती हांडोरे, संगीता शहा, सोनाली दिवटे, हर्षाली पोरजे यांच्यासह १०० हून अधिक महिलांचा सत्कार करण्यात आली. या मेळाव्यास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने केमीस्ट बांधव उपस्थित हातेे. विशेष म्हणजे १५०हून अधिम महिला फार्मीसस्ट प्रथमत:च मेळाव्यास उपस्थित राहिल्याने अध्यक्ष शिंदे यांनी कौतुक केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यशवंत व्यायामशाळेच्या वतीने उन्हाळी टेबल टेनिस शिबीराची घोषणा

Next Post

रिलायन्स रिटेलचा धडाका दररोज उघडले ७ नवीन स्टोअर; तब्बल दीड लाख जणांना मिळाला रोजगार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
reliance retail

रिलायन्स रिटेलचा धडाका दररोज उघडले ७ नवीन स्टोअर; तब्बल दीड लाख जणांना मिळाला रोजगार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011