चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मान्सून विलंबाने महाराष्ट्रात बरसत आहे. अद्यापही राज्याच्या काही भागात पावसाची प्रतीक्षाच आहे. पाऊस आणि नाचणारा मोर यांचे अनोेखे नाते आहे. पावसाचे स्वागत करण्यासाठी मोर आपला संपूर्ण पिसारा फुलवून नाचतो. हे दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायला मिळणे तसे दुर्मिळच. त्यातही एकाचवेळी अनेक मोरांचे नृत्य पहायला मिळणे तसे अवघडच पण असाच काहीसा नजारा सध्या येथे पहायला मिळत आहे.
येथील शेतकरी शाहू थोरे यांच्या शेतात मोरांची शाळाच जणू भरल्याच चित्र पहावयास मिळत आहे. ढगाळ वातावरण आणि रिमझिम पडणा-या पावसात धुंद होऊन मोर थुई थुई नाचत असल्याचे चित्र होते. सप्तरंगी पिसारा फुलवत सुंदर नृत्य करुन लांडोरींना आपल्या कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न ते करत होते. या ठिकाणी एक प्रकारे मोरांची शाळा भरल्याच भासत असल्याच हे दृष्य होते. त्यामुले थोरे यांच्या शेतात आजू-बाजूच्या नागरीकांनी गर्दी केली होती.