चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोलनाका ते राहुड घाटाच्या दरम्यान ट्रकमधून तब्बल १ कोटी ३९ लाख ४४ हजार ७३३ रुपयांची औषधे लंपास करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी येथील सोनोफी नावाच्या औषध कंपनीमधून ५ कोटी ९७ लाख ६४ हजार २७ रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांच्या औषधांचे ५२३ बॉस घेऊन कुलेस कोल्ड चैन लिमीटेड, मुंबई या कंपनीचा ट्रक (क्र. एमएच ०४ जेयु २३३९) हा मुंबई-आग्रा महामार्गाने जात असताना. हा प्रकार घडला आहे.
नेमके काय घडले
४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हा ट्रक पिंपळगाव टोलनाका ते राहुड घाटाच्या दरम्यान जात होता. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने ट्रकचा पाठीमागील दरवाजा उघडला. ट्रकमधील एकूण १ कोटी ३९ लाख ४४ हजार ७३३ रुपये किमतीचे सोनोफी कंपनीची वेगवेगळ्या औषधांचे बॉक्स चोरट्यांनी लंपास नेले. याबाबत ट्रकचालक मोहंमद सलमान निसार अहमद रा. टोपरा, उत्तरप्रदेश याने मंगळवारी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Thieves stole drugs worth 14 million from a truck on the Mumbai-Agra highway Nashik Chandwad Mumbai Agra Highway Drug Theft 1 Crore