नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. असाच एक प्रकार जिल्ह्यातील चांदवड शहरात घडला आहे. चांदवड शहरातील गाडगाव चौक भागात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. दीपक रविंद्र गायकवाड असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक गायकवाड हा बालक बुधवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात खेळत असतांना ही घटना घडली. पळत आलेल्या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्यास चावा घेतला होता. कुटूंबियांनी बालकास तात्काळ चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले.
चांदवड नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. खासकरुन पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास भटके कुत्रे त्रास देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
⛔ *महावितरणचा लाचखोर इंजिनिअर एसीबीच्या जाळ्यात*
यासाठी मागितली ४० हजारांची लाच
https://t.co/80Ll238iLE#indiadarpanlive #nashik #acb #trap #bribe #msedcl #engineer #corruption— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 26, 2023
? संतापजनक!
*भररस्त्यात तरुणीची टोळक्याकडून छेडछाड…*
कुणी ओढणी खेचली…
कुणी कपडे ओढले…
https://t.co/AOFBjEyQO1#indiadarpanlive #sambhajinagar #young #girl #molestation #crime #youths #abuse— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 26, 2023
Nashik Chandwad Crime Stray Dog Bite Children Death