चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील कुंदलगाव शिवारातील वराडी येथे भीषण प्रकार समोर आला आहे. पुतणीच्या लग्नाला उपस्थितीत राहिले नाही या कारणातून पत्नी व दोन्ही मुलांनी लाठ्याकाठ्यांनी पुनमचंद शिवाजी पवार यांना बेदम मारहाण केली. या घटनेत पुनमचंद पवार यांचा मृत्यू झाला आहे. लग्न आणि भाऊबंदकीच्या वादातून एकाचा बळी गेला आहे.
पत्नी व दोन्ही मुलांमध्ये कौटूंबिक लग्नात उपस्थिती न राहिल्यामुळे शनिवारी रात्री भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. पत्नी पूनम व दोन्ही मुलांनी बापाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण केली यात पुनमचंद हे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत चांदवड येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पण उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पूनमंचद यांची पत्नी सुनिता पवार, मुलगा कृष्णा व भूषण पवार यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.
हे होते कारण
पूनमचंद शिवाजी पवार यांच्या पुतणीच्या लग्न सोहळ्यात पूनमचंद यांचे संपूर्ण कुटुंब होते. पण, पूनमचंद मात्र लग्नाला उपस्थित राहिले नाही. घरातील लग्न असतांना पूनमचंद उपस्थित न राहिल्याने त्यांच्या पत्नीसह मुलांना लग्नात विचारणा होऊ लागली होती. हीच गोष्ट पत्नीसह मुलांना खटकली. लग्नसोहळ्या नंतर सर्व जण घरी आल्यानंतर पूनमचंदही घरी आले. त्यानंतर या भांडणाला सुरुवात झाली. त्यानंतर भांडणाचे रुंपातर हाणामारीत झाले. यावेळी पत्नी आणि मुलांनी पुनमचंदला जबर मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला. नंतर मुलांचा ही बाब लक्षात आल्याने त्यांचे चुलते म्हणजेच पूनमचंद यांचे भाऊ भावराव यांना बोलविले होते. भावराव यांनी भावाची परिस्थिती पाहताच डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले. अखेर डॉक्टरांनी पूनमचंद यांना मृत घोषित केले.
Nashik Chandwad Crime Murder Beaten Wedding Issue