चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील बोराळे येथील ग्रामपंचायतीचा कंत्राटी ग्रामसेवक आणि सरपंच हे दोन्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकले आहेत. आतिश अभिमान शेवाळे (वय २८ वर्ष) आणि बाकेराव भाऊसाहेब जाधव (वय ५० वर्षे) अशी य लाचखोरांची नावे आहेत. शेवाळे आणि जाधव यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
एका व्यक्तीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बोराळे ग्रामपंचायतचे लोखंडी जिन्याचे काम (५० हजार रुपये) घेतले होते. हे काम पूर्ण झाल्याने उर्वरीत २० हजार रुपयांच्या बिलाची रक्कम घेणे बाकी होते. ही रक्कम मुलाच्या अकाऊंटवर जमा करण्यासाठी शेवाळे आणि जाधव यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. शेवाळे याने स्वतःसाठी ७५००/-रुपये व जाधव याच्यासाठी ७५००/-रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. आणि ही लाच घेताना दोन्ही रंगेहाथ सापडले. याप्रकरणी शेवाळे आणि जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी*
वैशाली पाटील ,(पोलीस उप अधीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 7722000949
सापळा पथक*-
पो. ना. शरद हेंबाडे ,
पो. ना.राजेंद्र गिते चा पोना परशराम जाधव
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
**मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*
Nashik Chandwad ACB Raid Gramsevak Sarpanch Bribe