नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या पत्नी ॲड विद्या चांदगुडे यांचाही आज वाढदिवस आहे. इतकेच नाही त्यांचा मुलगा आराध्य याचाही आज वाढदिवस आहे. परिवारातील चौघांपैकी तिघांचे वाढदिवस एकाच दिवशी आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सामाजिक कामे करून ते अनोखा वाढदिवस साजरा करत आहे.
आज ५ सप्टेंबर आहे. भारतभर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षकाच्या घरी या दिवशी आपत्य जन्माला आलं तर विशेषच!नाशिक मध्ये एकाच कुटुंबातील तिघे याच दिवशी जन्माला आले आहे.कृष्णा यांचे वडील शिक्षण होते व ॲड विद्या यांचे आई वडीलही शिक्षक होते. त्यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी जन्म झाल्याने ते आनंद व्यक्त करतात.
कृष्णा चांदगुडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त आहेत. जात पंचायत मूठमाती अभियानाचे ते राज्य कार्यवाह आहे. त्यांच्या पुढाकाराने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत झाला आहे.तर विद्या ह्या वकील आहे. तर आराध्य हा अकरावीला शिकत आहे.सामाजिक उपक्रम राबवून ते वाढदिवस साजरा करत असतात.एकाच दिवशी तिघांचे वाढदिवस आल्याने मित्र परीवार व नातेवाईक आश्चर्य व्यक्त करतात.
Nashik Chandgude Family Father Mother Son Birthday Same Date