शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये चेनस्नॅचर आता थेट घराच्या दारापर्यंत; गेटमधून ओरबाडली सोनसाखळी (व्हिडिओ)

by Gautam Sancheti
डिसेंबर 20, 2021 | 3:29 pm
in क्राईम डायरी
0
Capture 16

 

नाशिक – शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून चेनस्नॅचर बिनदिक्कतपणे चेनस्नॅचिंग करीत आहेत. त्यातच आता चेनस्नॅचर आता थेट महिलांच्या दारापर्यंत आले आहेत. त्यामुळेच सिडको परिसरात चेन स्नॅचरने घराच्या गेटमधूनच महिलेची सोनसाखळी लांबवली आहे. चेन स्नॅचरचे हे धाडस महिलांमध्ये धडकी भरवणारे आहे.

सिडकोसह शहर परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. एकापाठोपाठ एक घटना समोर येत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुरकुले हॉल पाठीमागच्या ओम कॉलनी परिसरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून पावणे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र भरदिवसा लांबवण्यात आले आहे. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांच्या या धाडसाने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनम मनोहर दरेकर (वय 60 वर्षे, रा. गजलक्ष्मी रो हाऊस, ओम कॉलनी) या आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घरासमोर झोपाळ्यावर फोनवर बोलत होत्या. त्यादरम्यान दुचाकीवरून दोन जण त्यांच्या गेटसमोर आले.  त्यांनी एक कागद दाखवत पत्ता विचारण्याचा बहाणा दरेकर यांच्याकडे केला. त्याचवेळी या भामट्यांनी दरेकर यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडले. तसेच, क्षणार्धात त्यांनी दुचाकीने धूम स्टाईल पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्वरित परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे  पोलिस हे सोनसाखळी चोरट्यांचा तपास करत आहेत. बघा हा सीसीटीव्ही व्हिडिओ

https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/1629811580705853/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृह प्रवेश बंदी विरोधात आखाडा परिषद न्यायालयात?

Next Post

जयपूरमधील राजघराण्याच्या मालमत्तेवरील वाद शमला; असा निघाला तोडगा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
SC2B1

जयपूरमधील राजघराण्याच्या मालमत्तेवरील वाद शमला; असा निघाला तोडगा

ताज्या बातम्या

Untitled 6

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 9, 2025
jail11

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऑगस्ट 9, 2025
RUPALI

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

ऑगस्ट 9, 2025
प्रातिनिधिक फोटो

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

ऑगस्ट 9, 2025
fir111

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 9, 2025
crime11

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

ऑगस्ट 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011