नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) सिग्नलवर रस्ता ओलांडणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला एसटी बसने चिरडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघाताबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची एमएच १५ बीएल ३४४५ या क्रमांकाची बस नाशिकहून नंदुरबारकडे आज दुपारच्या सुमारास जात होती. ही बस सीबीएसच्या सिग्नलवर आली. त्याचवेळी २१ वर्षी तरुणी रस्ता ओलांडत असताना बसची जोरदार धडक तरुणीला लागली. त्यामुळे ती जागीच कोसळली आणि दुर्देवाने बसचे चाक या तरुणीच्या अंगावरुन गेले. युवतीला उपचारार्थ तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणीचे नाव वैशाली गायकवाड असे आहे.