अंबडला कारच्या धडकेत युवा कामगार ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ता ओलांडत असतांना भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत २० वर्षीय पादचाकी कामगार ठार झाला. हा अपघात औद्योगीक वसाहतीतील सुदाल कंपनी भागात झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमरीश बाबूलाल कौल (रा.हॉटेल सुमनचंद्र पांडवलेणी) असे मृत कामगाराचे नाव आहे. कौल बुधवारी (दि.२३) नेहमीप्रमाणे कंपनीत कामावार गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो सुदाल कंपनी समोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. भरधाव आलेल्या एमएच १५ एचजी ८८९९ या चारचाकीने त्यास धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. राहूल पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. दरम्यान अपघातानंतर चारचाकी चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी हवालदार पानसरे करीत आहेत.
महात्मानगर येथे कार झाडावर आदळून तरुण ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव कार झाडावर आदळल्याने २१ वर्षीय तरूण ठार झाला. हा अपघात महात्मानगर भागात झाला असून, चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आदित्य देविदास पगारे (रा.आशिर्वाद रेसि.आरटीओ कॉलनी,बोधलेनगर पुणारोड) असे कार अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. पगारे मंगळवारी (दि.२२) रात्री मित्र चैतन्य संजय विसावे याच्या समवेत कारमधून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. चालक विसावे याच्या जवळ बसून तो महात्मानगर येथून एमएच १५ एएक्स ०११४ या कारमधून एबीबी सर्कलच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. सिक्स सिग्मा हॉस्पिटल भागात भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. चालकाचे आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात पगारे याच्या डोक्यास मार लागून नाका तोंडातून रक्त आले होते. गंभीर अवस्थेत कुटूंबियांनी त्यास तात्काळ सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल केले असता मध्यरात्री उपचार सुरू असतांना डॉ.सनी खुने यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.
Nashik Car Accident Crime Youth Death