नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिकच्या इंदिरा नगर भागात असलेल्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब ठेवल्याचा ई- मेल आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर शाळा प्रशासनाने सर्व विदर्थ्यांना बाहरे काढले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.
या घटनेची माहिती आता शाळा प्रशासनाने दिली आहे. त्यांनी सांगितले की. आज १५ सप्टेंबर रोजी १.४४ वाजता शाळेला एक ईमेल प्राप्त झाला. या मेलनुसार शाळेच्या शौचालय तसेच आवारात तीन बॉम्ब ठेवले असून लवकरात लवकर शाळेमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढावे असा मजकूर होता.
हा मेल प्राप्त झाल्यानंतर त्वरित इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे शाळे मार्फत तक्रार देण्यात आली. त्यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनने बॅाम्ब शोध पथकाला पाचारण केले. दरम्यान सुरक्षा उपाययोजना म्हणून पालकांना सुचित करून विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोध पथकाने शाळेची पूर्ण तपासणी केली व त्यांना आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही..