इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात एका कॅफेवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मिळताच नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना बरोबर घेऊन छापा टाकला. यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाच ते सहा प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले आहे.
सरकार वाडा पोलीस स्टेशन आणि गंगापूर रोड पोलीस स्टेशनच्या सीमा रेषेवर मोगलीज नावाचा कॅफे होता. गेल्या पाच वर्षापासून हा कॅफे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या कॅफेमध्ये काही कंपार्टमेंट करण्यात आले होते. मुलं-मुली तिथे अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवयानी फरांदे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी धाड टाकली. नाशिकची संस्कृती बिघडू नये म्हणून अशा प्रकारावर पोलिसांनी कारवाई करावी असेही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.