नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक बिझिनेस असोसिएशन ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. Hotel Citadel येथे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. नाशिक बिझिनेस असोसिएशन ही संस्था गेल्या 9 वर्षांपासून व्यवसाय वृद्धीसाठी अनेक कार्यक्रम करत आहे. या ग्रुपमध्ये साधारणता 100 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी असतात. मागील वर्षी NBA मुळे 150 कोटीची उलाढाल झाली. दर गुरुवारी हॉटेल BLVD येथे सर्व सभासद जमतात, एकमेकांना व्यवसायाचे संदर्भ दिले जातात. मोटिव्हेशनल कार्यक्रम, व इतर अनेक कार्यक्रम घेतले जातात.
नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी मिलिंद तारे, सेक्रेटरी संजय लोळगे, उपाध्यक्ष विक्रम खैरनार, जॉईंट सेक्रेटरी योगेश बाहेती, खजिनदार अभय अगस्ते यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुधीर बिरारी यांनी केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपला व्यवसाय कसा वाढवायचा हे एनबीए ( NASHIK BUSINESS ASSOCIATION) च्या माध्यमातून उदयोजकांना मार्गदर्शन मिळते.
मुख्य समिती बरोबरच इतर कार्यसमिती जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये नितीन राका,समीर मुळे, संदीप पाटील, मधुरा कुंभेजकर, अमित पवार, अमित कोटकर, बाळासाहेब आमरे, हितेश कारिया,गोपाल सुमरा, संदीप पहाडी, आनंद सूर्यवंशी, जगदीश शास्त्री, उमेश शिंदे, विशाल देसले, वैशाखी सोनार, दीप भागवत, डॉ सुरेश सूर्यवंशी, डॉ बोरसे , डॉ मितेश पारिख, कमलेश कोठारी, सोमनाथ बधान, आर्कि योगेश धामणे, किरण नवले,अमोल जोशी, निलेश जोशी, ऍड देवदत्त जायखेडकर, राहुल तिडके, डॉ परेश अलवानी , डॉ शैलेश बोन्दर्डे,CA आनंद झंवर,अनिकेत बागडे, डॉ प्रणव माळी, चेतन कुलकर्णी, जयप्रकाश चौधरी,डॉ ब्रिजमोहन महाजन, डॉ योगेश घोंगडे,मनीष बोथरा, मयूर शिरोरे, सौरभ शिरोडे, ईश्वर जाट,विजय गायकवाड, वाबळे, विजय दिनानी, वैभव आव्हाड,राजेंद्र कोटकर, भास्कर सोनावणे, सुनील किनकर, सुदीप लोढा,विजय गायकवाड, शैलेश कावळे, शरद अमृतकर,नूतन सोनावणे, मेहुल भूपतानी, मकरंद देशपांडे,विजय दीक्षित, प्राजक्ता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या उद्योग संस्थेचे विश्वस्त दिनेश शर्मा, उन्मेष देशमुख, संदीप सोनवणे, डी जे धामणे, रविंद्र आवळे उपस्थित होते.