नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेफरन्स मार्केटिंगमध्ये आपण एकमेकांना व्यवसाय देतो, परंतु आता असे अनेक शासकीय पोर्टल आहेत त्याद्वारे सुद्धा आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो, आपण आपला बिझिनेस ग्रुप म्हणून न रहता एक एनबीए कुटुंब झाले असून यामध्ये व्यवसायाशिवाय अनेक उपक्रम सदस्यांसाठी तसेच समाजासाठी आपण राबवतो हि उल्लेखनीय बाब असल्याचे प्रतिपादन मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी केले.
नाशिक बिझिनेस असोसिएशनच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी मनपा उपायुक्त घोडे पाटील बोलत होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून धनंजय बेळे, संतोष मंडलेचा, आशिष कटारिया, विजय सानप, निखिल पांचाळ,धनंजय धुमाळ,आर्की.चारुदत्त नेरकर, सुनील चोपडा,मिलिंद शेटे,विक्रांत आव्हाड, सुनील भोर, गोविंद नायर , संतोष लोढा, विजय बाविस्कर, संदीप काकड, केशव डिंगोरे, राजू व्यास, प्रवीण चांडक यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एनबीएच्या नूतन अध्यक्षपदी विक्रम खैरनार, उपाध्यक्ष बाळासाहेब आमरे, सेक्रेटरी वैशाखी सोनार,सहसेक्रेटरी नितीन राका, खजिनदार दिलीप रंगारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी आशिष कटारिया, संजय लोळगे, योगेश बाहेती, अभय अगस्ते यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. एनबीएच्या विविध सदस्यांचा डी जे धामणे, रवींद्र आवळे, दिनेश शर्मा, उन्मेष देशमुख, संदीप सोनवणे, मधुरा कुंभेजकर, राजेंद्र कोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नूतन अध्यक्ष विक्रम खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी धनंजय धुमाळ यांनी स्वरबद्ध केलेल्या एनबीएच्या गीताचे तसेच वार्षिक २०२३-२०२४ च्या प्लँनरचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचलन मधुरा कुंभेजकर, स्वागत नितीन राका, आभार बाळासाहेब आमरे यांनी मानले
Nashik Business Assosiation New Body Declared