नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील संशयिताला अटक करण्यात अखेर नाशिक पोलिसांना यश आले आहे. ट्रकने खासगी ट्रॅव्हल बसला जोरदार धडक दिल्याने बस पेटली. या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३८ प्रवासी जखमी आहेत. या अपघातातील फरार ट्रक चालक संशयित रामजी यादव (रा. उत्तर प्रदेश) याला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.
यादव हा आयशर ट्रक (जीजे 05 बीक्स 0226) भारधाव वेगाने चालवित होता. शनिवारी पहाटे या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या डिझेल टाकीला धडक बसली त्यातूनच बसने पेट घेतला. हा ट्रक सूरतहून सिन्नरला कोळसा घेऊन होता. या अपघातामध्ये बस जळून खाक झाल्याने १२ प्रवासी मृत्यूमुखी पडले. या प्रकरणी ट्रक चालकासह बस चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आठ मृतदेहांची ओळख पटली आहे. उर्वरित चार मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Nashik Bus Fire Accident Truck Driver Arrested
Travel Bus