येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे हे थेट येवल्यात आले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह सर्वप्रथम तहसीलदार यांना निवेदन दिले आणि थेट छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयावर जाऊन तेथे त्यांच्या कार्यालयीन स्वीय सहाय्यकांना निवेदन दिले. दवे पोचण्यापूर्वीच पोलिसांनी बेरिकेट लावत त्यांना कार्यलयात जाऊ न देता बाहेरच निवेदन देण्यास भाग पाडले. यावेळी भुजबळ यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ क्लिप देऊनही सरकार का कारवाई करत नाही असा सवाल दवे यांनी यावेळी उपस्थित केला.
भुजबळ यांनी ब्राम्हण समाजात मुलांची नावे, संभाजी, शिवाजी का ठेवली जात नाही तसेच सरस्वती देवी यांच्या बद्दल केलेल्या विधानामुळे ब्राम्हण समाज दुखावला असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या वक्तव्या विरोधात सरकार कारवाई करत नाही, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भुजबळांवर कारवाई करण्यात यावी यासाठी ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी आज येवल्याला आले होते.
काय होते वक्तव्य
शनिवारी नाशिकमध्ये बोलताना भुजबळ म्हणाले होते की, ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात. तसेच काही जणांना सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिले नाही. आमचे शिक्षण झाले ते महापुरुषांमुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुली करुन दिली. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यावर भुजबळांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिले. ब्राह्मण समाजाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे ते म्हणाले.
yeola news
Nashik Brahman Mahasangha Anand Dave Yeola Chhagan Bhujbal