नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार नाशिक महापालिका क्षेत्रात कोविड बूस्टर पुढील ७५ दिवसांपर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस पूर्ण केला आहे आणि त्यांना दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी नाशिक महानगपालिकेच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करु शकतात.
नाशिक महानगरपालिकेच्या शहरातील खालील दिलेल्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयात बूस्टर डोस मिळेल.नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे(नवीन बिटको) रुग्णालय येथे २४ तास लसीकरण केंद्र सुरु राहणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे २रा डोस बाकी असेल अशा लाभार्थ्यांनी तो लवकरत लवकर घ्यावा . आरोग्य केंद्रामध्ये मोफत बूस्टर डोस देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ करू नये.नाशिक महानगरपालिकडे लससाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन मा आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे. नाशिक महानगरपालिका कोविड १९ लसीकरण केंद्राची नावे अशी
कोविशील्ड
१) मायको पंचवटी श. प्रा. आ. केंद्र
२) मखमलाबाद श. प्रा. आ. केंद्र
३) नांदूर श. प्रा. आ. केंद्र
४) हिरावाडी श. प्रा. आ. केंद्र
५)म्हसरूळ श. प्रा. आ. केंद्र
६)रेड क्रॉस श. प्रा. आ. केंद्र
७)तपोवन श. प्रा. आ. केंद्र
नशिकरोड विभाग
१)नाशिकरोड श. प्रा. आ. केंद्र
२)गोरेवाडी श. प्रा. आ. केंद्र
३)दसक पंचक श. प्रा. आ. केंद्र
४)वडनेर दुमाला श. प्रा. आ. केंद्र
५)सिन्नर फाटा श. प्रा. आ. केंद्र
६)नवीन बिटको हॉस्पिटल
सातपूर विभाग
१)मायको सातपूर श. प्रा. आ. केंद्र
२)एम एच बी श. प्रा. आ. केंद्र
३)गंगापूर श. प्रा. आ. केंद्र
४)संजीवनगर श. प्रा. आ. केंद्र
५)इ. एस. आय. एस हॉस्पिटल
नाशिक पूर्व विभाग
१) वडाळागाव श. प्रा. आ. केंद्र
२) भारत नगर श. प्रा. आ. केंद्र
३) एस जी एम श. प्रा. आ. केंद्र
४) बजरंगवाडी श. प्रा. आ. केंद्र
५) उपनगर श. प्रा. आ. केंद्र
६) झाकीर हुसेन रुग्णालय
नाशिक पश्चिम विभाग
१) जिजामाता श. प्रा. आ. केंद्र
२)सुदर्शन कॉलनी श. प्रा. आ. केंद्र
३)बारा बंगला श. प्रा. आ. केंद्र
सिडको विभाग
१) अंबड श. प्रा. आ. केंद्र
२) पिंपळगाव खाम श. प्रा. आ. केंद्र
३)स्वामी समर्थ रुग्णालय
४)सिडको श. प्रा. आ. केंद्र
५)कामातवाडे श. प्रा. आ. केंद्र
कोवॅक्सिन
१)तपोवन श. प्रा. आ. केंद्र
२)नवीन बिटको हॉस्पिटल
३)सिडको श. प्रा. आ. केंद्र
४)झाकीर हुसेन रुग्णालय
Nashik Booster Vaccination Dose Centres list