नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक भाजप शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. जाधव यांनी सहा वर्षे शहर संघटक, सरचिटणीस या पदावर काम केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष असलेले अॅड. गिरीष पालवे यांनी चार वर्षाच्या कार्यकाळात अनेक कामे केली. पण, आगामी लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदलाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यात पालवे ऐवजी आता जाधव यांच्याकडे पक्षाची धुरा देण्यात आली.
नाशिक शहराध्यक्षबरोबरच दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव, दिंडोरी (उत्तर) शंकर रामदास वाघ, मालेगाव निलेश एन.कचवे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. त्याचबरोबरच उत्तर महाराष्ट्रातही बदल केले आहे. त्याची यादी खालीलप्रमाणे आहे.