नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी ओझर विमानतळ येथे आगमन झाले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दोघांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.
आज अमित शाह यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सातपुर येथील डेमोक्रॅासी हॅाटेलमध्ये भाजपचा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यात ७५० भाजपचे पदाधिकारी उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती आहे.
मंगळवारी अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यानंतर सांयकाळी छत्रपती संभाजी नगर येथे मेळावा झाला. आता नाशिकमध्ये व त्यानंतर कोल्हापूर येथे मेळावा होणार आहे.
या मेळाव्यामुळे भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अमित शाह मार्गदर्शन करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही जोरदार तयारी करण्यात आली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॅा. राहुल आहेर, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनील केदार, नाना शिलेदार, पवन भगुरकर हे प्रयत्नशील आहे.