नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनत पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यातील विदयमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण, या यादीत नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव नाही.
या पहिल्या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॅा. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्ये डॅा. राहुल आहेर यांनी माघार घेतली होती. येथे ॉबंधु केदा आहेर यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे शिफारस केली होती. पण, या ठिकाणी पक्षाने पुन्हा डॅा. राहुल आहेर यांनाच संधी दिली.
नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना पक्षांतर्गत मोठा विरोध असतांनाही पक्षाने त्यांना संधी दिली. राहुल ढिकले यांच्याबरोबरच गणेश गिते, बाळासाहेब सानप हे सुध्दा उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी करत होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही. तर बागलाणमध्ये माजी केंद्रीय राज्य मंत्री डॅा. भारती पवार यांचे नाव चर्चेत होते. पण, पक्षाने या ठिकाणी विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनाच पुन्हा संधी दिली.