नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक शहरातील तीन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट मिळले का? यावर आता चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे निरीक्षक नाशिकमध्ये येऊन केल्यानंतर या आमदारांची चिंता वाढली आहे. भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रत्येकाला तीन नावे सुचवण्याचे आवाहन केल्यानंतर या विदयमान आमदारांचे धाबे दणाणले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वाट्याला नाशिकमध्ये एकच लोकसभा मतदार संघ आला. या ठिकाणी उमेदवार बदलण्याची मागणी झाल्यानंतरही पक्षाने विदयमान खासदारांना संधी दिली. त्यामुळे ही जागा गमवावी लागली. आतपार्यंत या लोकसभा मतदार संघात सलग चार वेळा भाजपचा खासदार निवडून आला. पण, यावेळेस भाजपला मोठा झटका बसला. त्यामुळे भाजपही सावध आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत गुजरात पॅटर्नची चर्चा रंगू लागली आहे.
नाशिकमध्ये भाजपची अवस्था फारशी चांगली नाही. केंद्र, राज्यात व स्थानिक पातळीवर महानगरपालिकेत सत्ता असतांना सुध्दा या आमदारांना वेगळे काही करता आले नाही. या आमदारांनी टक्केवारीचे कामे सोडली तर मुलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. कोणताही नवा उद्योग व रोजगार निर्मितीसाठी याचे प्रयत्न तोकडे पडले. तर स्थानिक समस्या सोडवण्यातही हे फारसे सक्रिय दिसले नाही. भाजपचे ठरावीक पदाधिकारी, कार्यकर्ते सोडले तर सर्वसामान्य माणसांशी यांचे संबध व संपर्क फारसा नाही. त्यामुळे याची विकेट पडेल असेच चित्र सध्या असल्याची चिंता भाजपच्याच एका नेत्यांनी खासगीत व्यक्त केली.
मोठ मोठे कार्यक्रम घेणे व त्यातच रंगणे हे सोडले तर या आमदारांमध्ये नेतृत्व गुणही कमीच आहे. त्यामुळे एकालाही पंचवार्षिकमध्ये मंत्रीपद मिळाले नाही. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांना वारंवार नाशिकला यावे लागले. बहुतांश निर्णय तेच घेतात. नाशिकमध्ये एकही नेता नेतृत्व करु शकत नाही ही सुध्दा मोठी शोकांतिका आहे. मंत्री महाजन यांना जळगाव महानगरपालिकेची सत्ता राखता आली नाही. ते नाशिक महानगरपालिकेचे काम बघता हे सुध्दा नाशिकचे दुर्दैव ठरले आहे.
महानगरपालिकेतील भ्रष्टाचार निकृष्ट दर्जाची कामे, सुस्त प्रशासन या सर्व गोष्टीं जनतेच्या नजरेतून सुटलेल्या नाही. त्यामुळे त्याचा फटकाही या आमदारांना बसणार आहे. त्यामुळे या विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट मिळेल याची शास्वती कमीच आहे. जर दिलेच तर त्यांचा पराभव अटळ आहे असेही आता भाजपमधूनच बोलले जात आहे.