वडिलांच्या वाढदिवसानिमित्त
नाशिकच्या बिरारी कुटुंबियांचा
अतिशय कौतुकास्पद उपक्रम
– संजय खैरनार, नाशिक
गेल्या ४० वर्षांपासून समाजाची अविरत सेवा करणारे… विठ्ठल मंदिर सारख्या स्थानिक संस्थेचे अध्यक्ष ते अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहीर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व विश्वस्त पद भुषवणारे… मध्यवर्ती संस्थेच्या प्रत्येक राष्ट्रीय अध्यक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे… श्री बिरारी यांचा ७५ वा वाढदिवस आणि श्री. दत्तात्रय विष्णू बिरारी व सौ सुलभा बिरारी यांचा लग्नाचा ५०वा वाढदिवस यानिमित्ताने बिरारी कुटुंबियांनी समाजात आदर्श निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम केला आहे.
मुलगा विनय, जावई किरण, संजय, मुली सोनल, शीतल, स्नुषा दिपाली यांच्या आयुष्याचे दिपस्तंभ असणारे… नातवंड वेदांत, श्लोक, अनुष्का यांच्या बरोबर क्रिकेट मॅच वर पैजा लावणारे तसेच त्यांच्या आवडी निवडी जपत नातवंडांना संस्कारमय उच्चशिक्षित करणारे वात्सल्य पुर्ण आजोबा व आपल्या सर्वांना आपला “हक्काचा माणूस” म्हणून हवेहवेसे वाटणारे आपले “दादा”. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने वेगळा उपक्रम करण्यात आला. नावाप्रमाणे आपल्या पतीचे तसेच कुटुंबाचे जीवन खडतर पणात सुध्दा सुलभ करणाऱ्या आणि गोदामाई प्रमाणे अनेक आप्तेष्टांच्या जीवनात जीवन निर्माण करणाऱ्या आपल्या “सुलभाकाकू” उर्फ “गोदाकाकू”… दादांना संसारात गेल्या “५०” वर्षे साथ देत आहेत. दादांचे तसेच बिरारी कुटुंबाचे आयुष्याचा सुवर्णमहोत्सव करणारी पत्नी, सुन,आई,आजी…
दादा प्रवासात असतील तर अर्ध्या तासाने फोन करणाऱ्या… घरी आलेल्या पै पाहुण्यांना स्वतः आग्रहाने वाढणाऱ्या… मुल,जावई,मुली,सुन, नातवंडांचे गोकुळ करणाऱ्या सुलभाकाकु व दादा यांच्या सहजीवनाच्या “५०” व्या वर्षपूर्ती निमित्त आई-वडिलांवर निस्सीम प्रेम करणारे विनयभाऊ व सून नसून हक्काची मुलगी असणाऱ्या दिपालीताई यांनी दादांचा “७५” वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय केला…
दादा व सुलभाकाकु यांच्या “५०” व्या लग्न दिना निमित्त गोरगरीब लोकांचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी १,२५,०००/- (एक लाख पंचवीस हजार) रुपयांची औषधे इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत म्हसरुळ येथे कार्यरत असलेल्या मेडिकल सेंटरसाठी देण्यात आली. त्यासाठी IMA अध्यक्ष डॉ.राजश्री पाटील, सेक्रेटरी डॉ. डॉ.विशाल पवार, खजिनदार डॉ. माधवी मुठाळ यांच्या उपस्थितीत छोटेखानी सोहळा करण्यात आला. याप्रसंगी दत्तात्रय (दादा) बिरारी, सौ. सुलभाकाकु बिरारी, रमेश रेणगुंठेवार, किरण बागुल, संजय रेणगुंठेवार, राजेश जगताप, विनय बिरारी, दिपाली बिरारी, वेदांत बिरारी, सोनल रेणगुंठेवार, शितल बागुल, सचिन बिरारी, संयोगीनी बिरारी, अनुष्का रेणगुंठेवार, श्लोक रेणगुंठेवार, डॉ.नितीन वाघचौरे , डॉ. गौरी कुलकर्णी,डॉ. शलाका बागुल, डॉ.प्रेरणा शिंदे उपस्थित होते.
यानिमित्ताने मी एकच म्हणेल की आपल्या प्रत्येकाचे आयुष्याचे दादा व सुलभाकाकुंच्या सेवाभावी आयुष्याप्रमाणे सोने व्हावे…
दादा व काकु शतायुषी होवो… उभयतांना सुंदर निरोगी दिर्घायुषी सहजीवन लाभो ही प्रभु चरणी प्रार्थना.