नाशिक – नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे या निवडणुकीत ११ जागांसाठी आता ४० उमेदवार रिंगणात असणार आहे. या निवडणुकीत ६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यातील ५३ वकील उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द कररण्यात आली.
या निवडणुकीत असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी महेश आहेर, अलका शेळके व नितीन ठाकरे हे वकील रिंगणात आहे. उपाध्यक्षपदासाठी बाळासाहेब आडके, प्रकाश आहुजा, वैभव शेटे, सचिवपदासाठी शरद गायधनी, हेमंत गायकवाड, सुरेश निफाडे व सईद सय्यद हे वकील रिंगणात आहे. सहसचिव पदासाठी संजय गिते, शरद मोगल, प्रविण साळवे व चंद्रशेखर शिंदे हे वकील नशिब आजमावत आहे. महिला सहसचिव पदासाठी श्यामला दीक्षित, सोनल गायकर, सोनल कदम व स्वप्ना राऊत निवडणूक लढवत आहे. खजिनदार पदासाठी रवींद्र चंद्रमोरे, हर्षल केंगे व कमलेश पाळेकर तर तीन सदस्य पदांसाठी किरण बोंबले, अरुण दोंदे, अनिल गायकवाड, संतोष जथे, अरुण खांडबहाले, मिलींद कुरकुटे, दिलीप पिंगळे, वासिम सय्यद, किशोर सांगळे, अनिल शर्मा, शिवाजी शेळके, प्रतिक शिंदे, सोमनाथ उगलमुगले व महेश यादव हे रिंगणात आहे. महिला राखीव पदासाठी अश्विनी गवते, कोमल गुप्ता व मयुरी सोनवणे या निवडणूक लढवत आहे. सात वर्षांच्या आतील प्रॅक्टीस असणाऱ्या सदस्य पदासाठी वैभव घुमरे व विशाल मटाले हे रिंगणात आहे. काही दिवसांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. मतदार सदस्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून, सोशल मीडियावरुन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बिपीन शिंगाडा, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. संदीप डोंगरे, तर सदस्य म्हणून ॲड. भगवंत पाटोळे व ॲड. अतुल गर्गे काम पाहत आहेत.