नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील बेरोजगारांना,महिलांना छोट्या,मोठया व्यवसायिकांना तसेच स्वयंरोजगारांना शासनाच्या विविध महामंडळे आणि बँकाकडून कर्ज पुरवठा व्हावा यासाठी खा.गोडसे यांच्याकडून सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.गेल्या तिन महिन्यांपासून विविध बँकाच्या प्रशासनाकडे खा. गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध बँकांनी बारा हजार प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढली असून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण येत्या २८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्वयंरोजगारांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात यश आले असून यामुळे बारा हजार कुटूंबियांची आर्थिक विवंचना दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली.
जिल्ह्यातील विविध बॅका आणि महामंडळाकडून कर्ज प्रकरणे काढली जात नसल्याच्या तक्रारी स्वयंरोजगारांकडून खा.गोडसे यांच्याकडे आल्या होत्या.या तक्रारीची दखल घेत खा. गोडसे यांनी तिन महिन्यांपासून स्वयंरोजगारांची कर्ज प्रकरणे निकाली निघावीत यासाठी प्रयत्न सुरू केले होते.दरम्यान काळात खा.गोडसे यांनी बॅक ऑफ महाराष्ट्र,बडोदा बॅक,सेट्रल बॅक,स्टेट बँक,एचडीएफसी,अॅक्सिस बॅक,इंडियन बॅक,युनियन बॅक,इंडियन ओव्हरसिस, एचडीएफसी बँक,पंजाब नॅशनल,पंजाब -सिंध बॅक,आयसीआयसीआय,कोटक महिंद्रा,आयडीएफसी,कॅथलिक,फेड्रल,सिटी युनियन, कर्नाटका बॅक,आरबीएल आदी बँकांमध्ये स्वतः जात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्वयरोजगारांची प्रंलबित कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करण्याच्या सूचना केल्या होत्या.गेल्या तिन महिन्यांपासून याकामी खा. गोडसे हे बॅक प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होते.
कोणत्या बँकांनी नेमके किती कर्ज प्रकरणे निकाली काढली याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी खा. गोडसे यांनी आज सर्वच बँका आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक नाशिक पंचायत समितीच्या सभागृहात घेतली. बैठकीस महाराष्ट्र बँकेचे ( एलडीएम ) जिल्हा मॅनेजर आर.आर. पाटील, अजित सुरसे, डीआयसीचे मॅनेजर महाजन,केव्हिआयबीचे सुधिर केंजळे आदी मान्यवरांसह पंचवीस बॅकांचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यात जिल्हयातील शासनाच्या आठ महामंडळांकडून डीआयसी,मुद्रा,बचतगट,स्वनिधी आदी योजनांतर्गत विविध बँकांकडे आलेली बारा हजार कर्ज प्रकरणे निकाली काढल्याची माहिती उपस्थिती अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे.मंजूर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांची रक्कम सुमारे दोनशे कोटीच्या घरात आहे. मंजुर झालेल्या लाभार्थींना येत्या २८ फेब्रुवारी रोजी कालिदास कलामंदिर येथे कर्ज मंजुरी पत्र व धनादेश देण्यात येणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
Nashik Bank Loan Pending Proposals Sanctioned