इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी ब बॅंक कडे अनेक वर्ष अडकलेल्या मुदत ठेवी व त्या वरील व्याज मिळविण्यासाठी आज शुक्रवार 2 मै २०२५ रोजी, बँकेचे प्रशासक श्री चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेत सविस्तर चर्चा केली व लेखी निवेदन म वि प्र सेवक सोसायटीचे अध्यक्ष संजय नागरे उपाध्यक्ष नंदकुमार घोटेकर, मानद चिटणीस विनित पवार, संचालक प्रा. अनिल भंडारे, तज्ञ संचालक दत्तात्रय पडोळ आदीनी दिले.
मध्यवर्ती सहकारी बैकच्या आर्थिक व्यवहारातील अनियमततेमुळे अनियमित मुळे अनेक बैंक, सहकारी पतसंस्था वैयक्तिक श्री अशा ठेवी अडकलेल्या आहेत. मुदत पूर्ण झालेल्या रकमा आणि व्याज ही मिळत नाही. त्यामळे सर्वाची आर्थिक अडवणूक झाली आहे तरी मध्यवर्ती बँकेने तात्काळ या या सवाच्या ठेवी परत कराव्यात अशी भागणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकीत कर्जदारांची रक्कम नियमानुसार प्रमाणे सर्व मार्गानी वसूल करावी व सदर, रक्कम शासन खात्यात भरून ती संबंधित ठेवीदारांना प्राधान्यक्रमाने दयावी अशीही मागणी करण्यात आली आहे. कारण रिझव्ह बँकेने नियमानुसार बँकेने ठेवीदारांच्या ठेवीची प्रथम सुरक्षा केली पाहिजे शिवाय ठेवीदारांना पाच लाखापर्यंत सुरक्षा दिली जाते. परंतु सहकारी संस्थांच्या ठेवील सुरक्षा हमी खूपच कमी आहे. जिल्ह्याच्या वैयक्तिक व विविध सहकारी संस्था ठेवीदारांनी एकत्रित येऊन जिल्हा बँक व महाराष्ट्र शासन दरबारी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी लवकरच विचार सभा आयोजित करण्याचा मानस आहे.
निधी व व्याजाची जबाबदारी शासनाने घ्यावी
महाराष्ट्र शासन सहकार विभागाच्या वतीने सहकारी संस्था व सहकारी बँका यांना राखीव निधी सक्तीने जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवायला सक्ती करतात पण गेली अनेक वर्षे त्यावरील व्याज मिळत नाही म्हणून सदर निधी व व्याज याची जबाबदारीही शासनाने घ्यावी असे माझे मत आहे.
संजय नागरे अध्यक्ष -मविप्र सेवक सोसाटी
अध्यक्ष पगारदादा पतसंस्था प्रजोत(सहकार भारती)