शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये पुन्हा तणाव निर्माण होताच पोलिसांकडून लाठीचार्ज…परिस्थिती नियंत्रणात

by Gautam Sancheti
ऑगस्ट 16, 2024 | 5:27 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 47


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यांसाठी शुक्रवारी नाशिक जिल्हा बंदची हाक नाशिक जिल्हा सकल हिंदू समाजाने दिल्यानंतर जवळपास सर्व नाशिक शहर व जिल्हा बंद होते. पण, भद्रकाली परिसरात दुकान बंद करण्यावरुन दुपारी २ वाजता दोन गटात वाद झाला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे य़शस्वी प्रयत्न केले. पण, त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसानी लाठीचार्ज केला. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहे.

आज सकाळपासून नाशिक जिल्हयात हा बंद शांततेत सुरु आहे. किरकोळ घटना वगळात बंद शांततेत सुरु आहे. सर्वांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे १०० टक्के हा बंद यशस्वी झाला. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाने बंद दरम्यान मोर्चाही काढला. त्यावेळेसे दुपारी २ वाजता भद्रकाली परिसरात दुकान बंद करण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा साडेचार वाजता तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी दुचारी पाडण्यात आल्याचे समोर आले आहे.

या बंदला नाशिकमधील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, हिंदू जनजागृती समिती, समविचारी संघटना राजकीय पक्ष म.न.से, भाजपा, हिंदू एकता आंदोलन पक्ष, राष्ट्र‌वादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे व उबाठा) तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठींबा जाहीर केला आहे.

या आहे मागण्या
१. बांगलादेशातील हिंदूवरील हल्ले, घरांची लुट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सुचना द्याव्यात.
२. बांगलादेशातील हिंदूवरील वाढते हल्ले लक्ष्यात घेता तेथील हिदुना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी.
३. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता याची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने ‘भरपाई करावी.
४. बांगलादेशातील हिसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्या’ द्वारे (CAA) भारत सरकारने आश्रय द्यांवा.
५. तसेच यापुर्वीही जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत, या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जम्मू काश्मिर व हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा…असा आहे निवडणूक कार्यक्रम

Next Post

या ठिकाणी नामांकित २४ कंपन्यांमध्ये ३६४८ पदांकरिता होणार भरती…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
job

या ठिकाणी नामांकित २४ कंपन्यांमध्ये ३६४८ पदांकरिता होणार भरती…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011