नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यांसाठी शुक्रवारी नाशिक जिल्हा बंदची हाक नाशिक जिल्हा सकल हिंदू समाजाने दिल्यानंतर जवळपास सर्व नाशिक शहर व जिल्हा बंद होते. पण, भद्रकाली परिसरात दुकान बंद करण्यावरुन दोन गटात वाद झाला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे य़शस्वी प्रयत्न केले.
आज सकाळपासून नाशिक जिल्हयात हा बंद शांततेत सुरु आहे. किरकोळ घटना वगळात बंद शांततेत सुरु आहे. सर्वांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे १०० टक्के हा बंद यशस्वी झाला. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाने बंद दरम्यान मोर्चाही काढला. त्यावेळेसे दुपारी २ वाजता भद्रकाली परिसरात दुकान बंद करण्यावरुन तणाव निर्माण झाला होता.
या बंदला नाशिकमधील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, हिंदू जनजागृती समिती, समविचारी संघटना राजकीय पक्ष म.न.से, भाजपा, हिंदू एकता आंदोलन पक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे व उबाठा) तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठींबा जाहीर केला आहे.
या आहे मागण्या
१. बांगलादेशातील हिंदूवरील हल्ले, घरांची लुट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सुचना द्याव्यात.
२. बांगलादेशातील हिंदूवरील वाढते हल्ले लक्ष्यात घेता तेथील हिदुना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी.
३. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता याची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने ‘भरपाई करावी.
४. बांगलादेशातील हिसाचारामुळे तेथील जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्या’ द्वारे (CAA) भारत सरकारने आश्रय द्यांवा.
५. तसेच यापुर्वीही जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत, या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पाहता भारतीय सीमेवर चोख बंदोबस्त करावा.