नाशिक – विविध कारणांसाठी ख्यात असलेले नाशिक आता खाद्य पदार्थांसाठीही नावाजले जात आहे. नाशिकची मिसळ ही तर जगविख्यातच आहे. त्यात अनेकानेक बाबींची भर पडते आहे. आता सोशल मिडियात नाशिकचा एक पदार्थ चांगलाच हीट होत आहे. तो म्हणजे बाहुबली रोल. अंड्यापासून बनविल्या जाणाऱ्या या बाहुबली रोलचा व्हिडिओ फूड ब्लॉगर विवेक आणि आयेशा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अवघ्या दोन दिवसातच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. हा बाहुबली रोल दीड फूटांचा आहे. ६ अंड्यांपासून बनविला जाणारा हा रोल अतिशय चविष्ट आहे. या रोलमध्ये चिकन मसाला, चिकन किमा, विविध भाज्या आणि विविध चवीचे सॉस वापरण्यात आले आहेत. हा रोल ३०० रुपयांचा असून त्याला उत्तम मागणी आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आम्ही फार काही सांगण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ बघा, असे विवेक आणि आयेशा यांनी म्हटले आहे. बघा हा व्हिडिओ