नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातही रिक्षाची भाडेवाढ आजपासून लागू झाली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ)ने त्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार नाशिक शहरात मीटरनुसारच भाडे आकारणी करण्याचे निर्देश रिक्षाचालकांना देण्यात आले आहेत. पहिल्या दीड किलोमीटरसाठी यापूर्वी २१ रुपये आकारले जात होते. ते आता २७ रुपये करण्यात आले आहेत. तर, पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी यापूर्वी १४ रुपये आकारले जात होते. ते आता १८ रुपये आकारले जाणार आहेत. ही भाडेवाढ आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे. आरटीओने काढलेले आदेश खालीलप्रमाणे
Nashik Auto Rikshaw Fair Increase RTO Order
Traffic Transport