नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पायाभूत क्षेत्रात गुणवत्तापूर्ण व वेळेच्या अगोदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण देशभरात नावाजलेल्या नाशिकस्तिथ अशोका बिल्डकॉनचा नुकताच दक्षिण अमेरिकेतील गयाना येथे रस्ते प्रकल्पासाठी करार झाला. अशोका ग्रुपच्या आणि नाशिकच्या शिरपेचात हा आणखी एक तुरा यानिमित्तने रोवला गेला आहे. कंपनीच्या वतीने संचालक श्री. आशिष कटारिया यांनी ह्या करारावर सही केली.. जवळपास 825 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
अशोकाचे संचालक श्री आशिष कटारिया व श्री. आदित्य पारख यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प मिळाला आहे. फेज 1 च्या बांधकामासाठी बहुप्रतीक्षित करारावर स्वाक्षरी झाली आहे. ईस्ट बँक-ईस्ट कोस्ट रोड लिंकेज प्रकल्प भारत सरकारच्या DPA अंतर्गत EXIM बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून USD 50 दशलक्ष क्रेडिट लाइन ऑफ क्रेडिट अंतर्गत हा प्रकल्प आहे.24 जून 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम स्थायी सचिव व्लादिम परसाऊड. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. बिशप जुआन एडघिल, वित्त मा. डॉ.अशनी सिंग, कायदेशीर व्यवहार आणि अटर्नी जनरल मा. अनिल नंदलाल, मा. सुसान रॉड्रिग्ज, मा. देवदत इंदार, माजी राष्ट्रपती एचई डोनाल्ड रामोतर, उच्च आयुक्त डॉ केजे श्रीनिवास, इतर मान्यवर आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. .
गयानाच्या सर्व मंत्र्यांनी उत्तम गयाना तयार करण्यासाठी भारताने दिलेल्या उदार मदतीबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार मानले आणि ते यशस्वी करण्यासाठी भारतीय उच्च आयोग/MEA/EXIM बँकेचे कौतुक केले.
आतापर्यंत अशोका बिल्डकॉनने देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मालदीव येथे अनेक मोठे व विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केले आहे. दक्षिण अमेरिकेत 825 कोटी रुपयांचा रस्ते प्रकल्प मिळणे कंपनी आणि नाशिकच्या साठी पण खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. हा प्रकल्प देखील टीम अशोका आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करेल असा मला विश्वास आहे.
– आशिष कटारिया (संचालक, अशोका बिल्डकॉन लिमिटेड)
nashik ashoka buildcon south america road construction